इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाइन स्पर्धा

State-level online competition for teachers of classes 1st to 8th
विद्यार्थ्यांचे अध्ययन सुधारण्यासाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीने, प्रयोगशील आणि इनोव्हेटिव्ह उपक्रम घेणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी शाब्बास अकॅडमी तर्फे ही विशेष स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
ही स्पर्धा नवीन पद्धतीने शिकवणाऱ्या, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम घेणाऱ्या आणि शिक्षणात नवकल्पना करणाऱ्या शिक्षकांसाठी ठेवण्यात आली आहे.
सर्व प्राथमिक शिक्षकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
📌 स्पर्धेत सहभाग कसा घ्यायचा?
1️⃣ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घेतलेल्या Inovative Teaching Activity चा 3 ते 5 मिनिटांचा एकसंध, न एडिट केलेला (one-take) व्हिडिओ शूट करावा.
2️⃣ हा व्हिडिओ Google Drive मध्ये अपलोड करावा.
3️⃣ लिंकची सेटिंग “Anyone with the link / Viewer” अशी करावी.
4️⃣ ती लिंक Google Form मध्ये पेस्ट करावी.
5️⃣ Google Form मध्ये आपली माहिती अचूक भरावी.
🏆 राज्यस्तरीय बक्षिसे :
राज्यातील सर्वोत्कृष्ट दहा शिक्षकांची निवड करून आकर्षक बक्षिसे देण्यात येतील.
🎖 सहभाग प्रमाणपत्र :
Google Form सबमिट होताच शिक्षकांच्या ई-मेलवर लगेच सहभाग प्रमाणपत्र पाठवले जाईल.
📅 स्पर्धेचा कालावधी :
1 जानेवारी 2026 रोजी निकाल घोषित केला जाईल.
