आमची ओळख

शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा विश्वासार्ह प्रवास!
शाब्बास अकॅडमीची स्थापना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. साध्या सुरुवातीपासून आजपर्यंत, शाब्बास अकॅडमीने हजारो विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासाला दिशा दिली आहे.
शाब्बास अकॅडमीची सुरुवात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार शिक्षण आणि वैयक्तिक
मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
ही अकॅडमी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या आत्मविश्वास, शिस्त आणि
यशस्वी भविष्याच्या घडणीसाठी उभारली आहे.
आज शब्बास अकॅडमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विश्वासार्ह आधार बनली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खास फायदे

शाब्बास टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना अभ्यास, सराव, मूल्यांकन आणि राज्यस्तरीय स्पर्धेचा अनुभव मिळतो.

आमचं ध्येय

“शिकणं आनंददायी बनवणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त क्षमता उजळवणं.”
शाब्बास ॲकॅडमी ही पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण देणारी एक सर्वसमावेशक डिजिटल शिक्षणसंस्था आहे. आम्ही प्रत्येक मुलामधील वेगळेपण आणि कौशल्य ओळखून, त्याला योग्य दिशेने विकसित करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी मजेशीर पद्धतीने शिकतात, परीक्षा देतात आणि स्वतःच्या प्रगतीचा मागोवा ठेवतात.
शिक्षणाला ताणमुक्त आणि प्रेरणादायी बनवणं – जेणेकरून विद्यार्थी फक्त गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकतील.

आमचं उद्दिष्ट

शाब्बास टॅलेंट सर्च एक्झामिनेशन”च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्ता ओळखून, त्यांना शिक्षणाच्या आधारावर योग्य करिअरची दिशा मिळवून देणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
लहान वयातच विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि बौद्धिक कल लक्षात घेऊन त्यांना विविध स्पर्धा परीक्षा, करिअर पर्याय आणि भविष्यातील संधी यांची ओळख करून दिली जाते.
आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थी स्वतःची ताकद ओळखेल, आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेईल आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनेल.

आमचे उपक्रम

“हिरकणी महोत्सव

हिरकणी महोत्सव हा शाब्बास अकॅडमीचा विद्यार्थ्यांच्या कला, संस्कार आणि आत्मविश्वासाला नवी दिशा देणारा विशेष उपक्रम आहे. या महोत्सवामध्ये नृत्य, गायन, वक्तृत्व, अभिनय, चित्रकला, कथाकथन आणि विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांना स्वतःची कला सादर करण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि नेतृत्वगुण विकसित होतात. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये दडलेल्या प्रतिभेला ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, हीच या महोत्सवामागील मुख्य प्रेरणा आहे. आनंद, उत्साह आणि प्रेरणेने भरलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरतो.

“समर कॅम्प

शाब्बास अकॅडमीचा समर कॅम्प हा विद्यार्थ्यांच्या सुट्टीला शिक्षण, सर्जनशीलता आणि मनोरंजनाची जोड देणारा विशेष उपक्रम आहे. या कॅम्पमध्ये विविध शैक्षणिक अ‍ॅक्टिव्हिटी, व्यक्तिमत्व विकास सत्रे, क्रिएटिव्ह वर्कशॉप्स, खेळ, हस्तकला, टीम बिल्डिंग गेम्स आणि संवादकौशल्य विकसित करणारे उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्यासोबतच मैत्री, सहकार्य आणि आत्मविश्वास वाढवण्याची संधी मिळते. अभ्यासाच्या चौकटीबाहेर जाऊन आनंदी वातावरणात शिकण्याचा अनुभव देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे, हा या समर कॅम्पचा मुख्य उद्देश आहे.

“रोबोटिक्स”

 

शाब्बास अकॅडमीचा रोबोटिक्स उपक्रम हा विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञान आणि नवकल्पनांची ओळख करून देणारा भविष्याभिमुख कार्यक्रम आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोबोट तयार करणे, सेन्सर्स, मोटर्स, कोडिंग आणि ऑटोमेशन यांसारख्या तांत्रिक संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवल्या जातात. लहान वयातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता आणि क्रिएटिव्हिटी विकसित करण्यावर भर दिला जातो. विविध प्रोजेक्ट्स, मॉडेल्स आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थी शिकताना आनंद घेतात आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या जगासाठी स्वतःला तयार करतात.

शाब्बास अकॅडमी विषयी

भविष्यातील Scholarship, Olympiad, JEE, NEET, UPSC, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मजबूत पाया तयार करणे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

STS 2027 म्हणजे काय?

STS 2027 ही इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्राची राज्यस्तरीय ऑनलाइन गुणवत्ता शोध परीक्षा आहे.

महाराष्ट्र बोर्ड व CBSE बोर्डच्या इयत्ता 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

मराठी
• English

परीक्षा पूर्णतः ऑनलाइन आहे.

विद्यार्थी घरबसल्या मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप किंवा संगणकावर परीक्षा देऊ शकतात.

सकाळी 09:00 ते रात्री 09:00

होय.
दिलेल्या कालावधीत एकदाच परीक्षा देता येईल.

सर्व प्रश्न MCQ स्वरूपातील असतील.

प्रत्येक प्रश्नाला 2 गुण.

नाही.

35%

नाही.

• NCERT
महाराष्ट्र राज्य मंडळ

85% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना.

85% ते 90%

91% ते 95%

96% ते 100%