शाब्बास गोष्ट सांगणे स्पर्धा

इयत्ता १ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यावर आधारित गोष्ट सांगणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
📌 स्पर्धेचे नियम :
1. विद्यार्थ्याने निवडलेल्या धड्याचे नाव सांगून पूर्ण धडा गोष्टीच्या स्वरूपात सांगायचा आहे.
2. पाठ न बघता सादरीकरण करणे अनिवार्य आहे.
3. सादरीकरणाची वेळ ५-७ मिनिटे.
4. व्हिडिओ काढताना समोर कोणतेही पुस्तक नसावे.
5. व्हिडिओ कट केलेला, एडिट केलेला किंवा जोडलेला नसावा.
सलग एकदाच सतत चालू अशा पद्धतीने (One-take video) व्हिडिओ शूट करावा.
6. व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून Google Drive मध्ये अपलोड करावा.
7. लिंकची सेटिंग Anyone can see / Viewer अशी करावी.
8. तयार झालेली Drive लिंक Google Form मध्ये पेस्ट करावी.
📅 स्पर्धेचा कालावधी : 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर
🏆 सर्वोत्कृष्ट 10 विद्यार्थ्यांची निवड
🎉 1 जानेवारी 2026 रोजी निकाल घोषित केला जाईल.
