शाब्बास ग्रुप डान्स कॉम्पिटिशन

इयत्ता 1 ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी
महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला आणि लोकगीते जपण्यासाठी राज्यस्तरीय ऑनलाइन ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित केली आहे.
📌 स्पर्धेची प्रमुख माहिती :
स्पर्धेचा कालावधी : 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर
प्रत्येक शाळेला सहभाग शुल्क : ₹100/-
नृत्याची वेळ : 3 ते 5 मिनिटे (5 मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ बाद)
व्हिडिओ पूर्णपणे सलग एकदाच (One-take) शूट केलेला असावा – एडिट नाही
नृत्य फक्त महाराष्ट्रातील लोकगीते / लोकसंगीत / पारंपारिक गीतांवरच ( लावणी नृत्य सोडून )
व्हिडिओ शाळेच्या परिसरातच शूट केलेला असावा
नृत्य झाल्यानंतर मुख्याध्यापक + शिक्षक + सर्व विद्यार्थी यांचा जिओ-लोकेशनसह फोटो आवश्यक
व्हिडिओ व फोटो Google Drive मध्ये अपलोड करून लिंक “Anyone with link / Viewer” सेट करावी
लिंक Google Form मध्ये पेस्ट करावी
🎖 सहभाग प्रमाणपत्र :
फॉर्म सबमिट होताच शाळेच्या ई-मेलवर सहभाग प्रमाणपत्र पाठवले जाईल.
सहभागी प्रमाणपत्र आपणास मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यासाठी खूप उपयुक्त
🏆 बक्षिसे :
राज्यातील सर्वोत्कृष्ट दहा शाळांना आकर्षक बक्षिसे दिली जातील.
1 जानेवारी 2026 रोजी निकाल घोषित केला जाईल.
