आमचं ध्येय – “शिकणं आनंददायी बनवणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त क्षमता उजळवणं.”
शाब्बास ॲकॅडमी ही पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण देणारी एक सर्वसमावेशक डिजिटल शिक्षणसंस्था आहे. आम्ही प्रत्येक मुलामधील वेगळेपण आणि कौशल्य ओळखून, त्याला योग्य दिशेने विकसित करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी मजेशीर पद्धतीने शिकतात, परीक्षा देतात आणि स्वतःच्या प्रगतीचा मागोवा ठेवतात.
आमचे ध्येय – शालेय शिक्षण अधिक सोपे, आनंददायक आणि व्यावहारिक बनवणे, हे ‘शाबास अकॅडमी’चे मुख्य ध्येय आहे. आम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी एक विश्वासार्ह मराठी शैक्षणिक प्लॅटफॉर्म तयार करत आहोत.”
आमचे अनुभवी शिक्षक – आमच्या टीमचे हृदय आणि आत्मा हे एक अनुभवी प्राथमिक शिक्षक आहेत. अनेक वर्षांच्या अध्यापनाच्या अनुभवातून आणि स्वतः एक पालक म्हणून, त्यांना विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या गरजांची सखोल माहिती आहे. त्यांचे नवनवीन आणि व्यावहारिक विचारच या ब्लॉगचा पाया आहेत.

