आमची ओळख
शिक्षणातून उज्ज्वल भविष्य घडवण्याचा विश्वासार्ह प्रवास!
शाब्बास अकॅडमीची स्थापना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. साध्या सुरुवातीपासून आजपर्यंत, शाब्बास अकॅडमीने हजारो विद्यार्थ्यांच्या यशस्वी प्रवासाला दिशा दिली आहे.
शाब्बास अकॅडमीची सुरुवात विद्यार्थ्यांना योग्य दिशा, दर्जेदार शिक्षण आणि वैयक्तिक
मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
ही अकॅडमी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या आत्मविश्वास, शिस्त आणि
यशस्वी भविष्याच्या घडणीसाठी उभारली आहे.
आज शब्बास अकॅडमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विश्वासार्ह आधार बनली आहे.
मार्गदर्शन देण्याच्या उद्देशाने करण्यात आली.
ही अकॅडमी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच त्यांच्या आत्मविश्वास, शिस्त आणि
यशस्वी भविष्याच्या घडणीसाठी उभारली आहे.
आज शब्बास अकॅडमी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा विश्वासार्ह आधार बनली आहे.
आमचं ध्येय
“शिकणं आनंददायी बनवणं आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधील सुप्त क्षमता उजळवणं.”
शाब्बास ॲकॅडमी ही पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, कौशल्य आणि मूल्याधारित शिक्षण देणारी एक सर्वसमावेशक डिजिटल शिक्षणसंस्था आहे.
आम्ही प्रत्येक मुलामधील वेगळेपण आणि कौशल्य ओळखून, त्याला योग्य दिशेने विकसित करण्यावर विश्वास ठेवतो. आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे विद्यार्थी मजेशीर पद्धतीने शिकतात, परीक्षा देतात आणि स्वतःच्या प्रगतीचा मागोवा ठेवतात.
शिक्षणाला ताणमुक्त आणि प्रेरणादायी बनवणं – जेणेकरून विद्यार्थी फक्त गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकतील.
आमचं उद्दिष्ट
“शाब्बास टॅलेंट सर्च एक्झामिनेशन”च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणवत्ता ओळखून, त्यांना शिक्षणाच्या आधारावर योग्य करिअरची दिशा मिळवून देणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे.
लहान वयातच विद्यार्थ्यांच्या आवडी, क्षमता आणि बौद्धिक कल लक्षात घेऊन त्यांना विविध स्पर्धा परीक्षा, करिअर पर्याय आणि भविष्यातील संधी यांची ओळख करून दिली जाते.
आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक विद्यार्थी स्वतःची ताकद ओळखेल, आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेईल आणि शैक्षणिक तसेच व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सक्षम बनेल.

ज्ञान
प्रत्येक विषय सखोल समजून घेऊन विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता निर्माण करणे.

सर्जनशीलता
विद्यार्थ्यांना नव्या कल्पना आणि अभिनव विचार मांडण्यास प्रोत्साहित करणे.

आत्मविश्वास
शिकण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढवणे.

प्रामाणिकपणा
शिक्षणात पारदर्शकता, शिस्त आणि प्रामाणिक प्रयत्न यांना प्राधान्य देणे.

सहकार्य
शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील समन्वयातून शिक्षण अधिक प्रभावी बनवणे.

सतत प्रगती
विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा सातत्याने विकास करून त्यांना भविष्यासाठी सज्ज करणे.
संपर्क साधा
तुमचे प्रश्न, शंका किंवा सूचना – आम्हाला कळवा!
शाब्बास ॲकॅडमी
५२३ ब, करंजे पेठ, नंदायन, सातारा.
+91 98765 43210
info@shabbasacademy.com
विद्यार्थ्यांचा विश्वास
Excellent 4.9 out of 5
संपर्क फॉर्म
शाब्बास ॲकॅडमीमध्ये आम्ही शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन यासाठी सदैव तत्पर आहोत. फॉर्म भरून आमच्याशी संपर्क करा — आमची टीम तुमचं मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे.
